
Marathi Entertainment News : दबंग आणि लुटेरे सारख्या लोकप्रिय चित्रपटांतून आपली छाप पाडणारी सोनाक्षी सिन्हा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री ज्योतिका – या दोघीही पहिल्यांदाच एका हिंदी प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. या प्रोजेक्टचं नाव अद्याप जाहीर झालेलं नसून, ही एक कोर्टरूम ड्रामा फिल्म आहे ज्याचे दिग्दर्शन नील बटे सन्नाटा आणि पंगा फेम अश्विनी अय्यर तिवारी करत आहेत. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे – यामध्ये सोनाक्षी आणि ज्योतिका एकमेकींविरुद्ध कोर्टात भिडताना दिसणार आहेत!