
आज १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे पालक, छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आहे. संपूर्ण भारतातच नाही तर परदेशातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. प्रत्येक गडकिल्ल्यावर महाराजांचं अस्तित्व आजही जाणवतं. आज तेच गडकिल्ले फुलांनी सजलेत. ठिकठिकाणी मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलंय. अनेक कलाकारांनीदेखील चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेदेखील एका अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली आहे.