

Tighee Movie Trailer Out
esakal
Marathi Entertainment News : आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं... तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.