
Entertainment News : काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चर्चेत राहिलेला मनसेचा काव्यवाचन आणि अभिजात पुस्तक प्रदर्शन सोहळा गाजला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तर मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. सोशल मीडियावर या सोहळ्याचे व्हिडीओ चर्चेत आहेत. त्यातीलच एक व्हिडीओ गाजतोय सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा.