SONALI BENDRE CANCER JOURNEY
esakal
SONALI BENDRE EMOTIONAL INTERVIEW WITH MADHURI DIXIT: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने आजवर अनेक सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. आता सोनाली निर्मीती क्षेत्रात वळाली असून लवकरच तिचा 'सोहळा' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ती अनेक ठिकाणी प्रमोशन करताना पहायला मिळतेय. अशातच तिने 'कोण होणार करोडपती' या मराठी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माधुरीला बोलताना तिने तिच्या कॅन्सरच्या कठीण काळाबद्दल सांगितलं. सोनालीचं बोलणं ऐकून माधुरी सुद्धा भाऊक झाल्याचं पहायला मिळालं.