

sonali bendre on michael jackson
esakal
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली. ९० चा काळ तिने गाजवला. सगळीकडे सोनालीचं नाव गाजत होतं. अशातच तिच्या यशाच्या यादीत खोवला गेलेला मानाचा तुरा म्हणजे तिने मायकल जॅक्सनचं केलेलं स्वागत. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी लोकप्रिय गायक आणि डान्सर मायकल जॅक्सन मुंबईत आला होता. तेव्हा सोनालीने मायकलचं स्वागत केलं होतं. तेव्हा ती मराठमोळ्या अंदाजात दिसली होती. तिने नऊवारी साडीदेखील नेसली होती. तेव्हा तिच्या काय भावना होत्या हे अभिनेत्रीने सांगितलं आहे.