

sonali bendre SON REACTION
ESAKAL
मराठमोळी सोनाली बेंद्रे हिने ९० च्या दशकात तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या दिसण्याची संपूर्ण तरुणाईला भुरळ पडलेली. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. अनेक टॉप अभिनेत्यांसोबत तिने सिनेमे केलेत. मात्र २०२८ मध्ये सोनालीला कर्करोग झाला. जेव्हा तिला याबद्दल समजलं तेव्हा ती पूर्ती खचली होती. तिला ‘हाय-ग्रेड मेटास्टॅटिक कॅन्सर’चे निदान झालेलं. हे समजल्यावर तिच्या मुलाची प्रतिक्रिया काय होती हे तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.