

SONALI BENDRE REFUSE TO WEAR A WIG
ESAKAL
बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठी मुलींपैकी एक म्हणजे सोनाली बेंद्रे. सुंदर सोज्वळ चेहरा आणि सात्विक भाव, शांत नजर यामुळे तिच्या चेहऱ्यातील वेगळपण प्रेक्षकांना जाणवायचं. तिचा अभिनयही सहज सुंदर होता. मात्र २०१८ साली तिच्या आयुष्यात अशी गोष्ट घडली ज्यासाठी ती तयार नव्हती. सोनालीला कर्करोगाचं निदान झालं. तिचे केस गळायला लागले. टक्कल व्हायला लागलं त्यामुळे तिने खास विगदेखील बनवून घेतले होते. मात्र ते विग तिने घातलेच नाहीत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलंय.