मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. 'नटरंग', हिरकणी, 'मितवा' सारख्या गाजलेल्या चित्रपटामध्ये सोनालीने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. दरम्यान सोनाली सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. अशातच आता सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.