बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम याने बेंगलुरू कॉन्सर्ट वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून बंगलुरू कॉन्सर्टमुळे सोनू निगम चर्चेत आला होता. त्याच्या विरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आता सोनू निगमने स्पष्टीकरण दिलं असून 'पहलगाममध्ये जेव्हा पॅन्ट उतरवायला लावली तेव्हा भाषा नव्हती विचारली?' असं वक्तव्य सोनू निगमने केलय. सध्या सोशल मीडियावर सोनू निगमच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.