
Bollywood News : हिमाचल प्रदेशमधील स्पिटी व्हॅलीमध्ये सोनू सूद विनाहेल्मेट बाईक चालवताना पाहायला मिळाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर अनेकांनी टीका केली. याचं कारण असं की काही दिवसांपूर्वीच सोनूने गाडी चालवताना घ्यायची सुरक्षेची काळजी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर स्वतःच नियम मोडत तो विनाहेल्मेट गाडी चालवताना पाहायला मिळाला.