Life Below Zero New Program On Sony BBC Earth
Life Below Zero New Program On Sony BBC Earth

सोनी BBC अर्थवर या जूनमध्ये उलगडणार ‘लाइफ बिलो झीरो’ चा नवीन सीझन आणि इतर खास कार्यक्रम

Life Below Zero New Program On Sony BBC Earth : सोनी बीबीसी अर्थवर नवीन कार्यक्रम सुरु होणार असून त्याचा टीझर नुकताच शेअर करण्यात आला.
Published on

Entertainment News : सोनी BBC अर्थ वाहिनी या जूनमध्ये अस्तित्वाच्या थरारक कहाण्या आणि प्रभावी पर्यावरणीय कथा यांचे मिश्रण घेऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवायला येत आहे. ‘लाइफ बिलो झीरो’च्या 11व्या सीझनचा प्रीमियर या चॅनलवर होणार आहे, ज्यामध्ये अलास्काच्या ओसाड प्रांतात राहणाऱ्या लोकांचा चिवटपणा दाखवला आहे. इतकेच नाही, तर पर्यावरण दिन आणि महासागर दिनास समर्पित अनेक कार्यक्रम या महिन्यात सादर होणार आहेत. यामध्ये काही निवडक डॉक्युमेंट्रीज बघायला मिळतील, ज्यामध्ये आपल्या ग्रहावर असलेली पर्यावरणविषयक आव्हाने आणि त्याचा नाजुक समतोल साधण्यासाठी होत असलेले प्रेरणादायक प्रयत्न यांचा आढावा घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com