
Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यातील बऱ्याच मालिका इतर भाषांमधील मालिकांवर आधारित आहेत. हा नवीन ट्रेंड सुरु असतानाच न चालणाऱ्या नव्या मालिका दोन-तीन महिन्यातच बंद करण्याची नवी पद्धतही सुरु झालीये. कमी टीआरपीमुळे वाहिन्यांकडून हा निर्णय घेतला जात असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच आता दोन नवीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.