
Marathi Entertainment News : सध्या मराठी इंडस्ट्रीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे रिलीज होत आहेत. नुकताच स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज सिनेमा रिलीज झाला. नुकतंच या सिनेमाचं स्क्रीनिंग श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या कुटूंबासाठी आयोजित करण्यात आलं.