
Asha Movie
ESakal
मुंबई : जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष स्क्रिनिंगला खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थित होती. महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.