

shah rukh khan
esakal
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने त्याचा ६० वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. त्याच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर संपूर्ण बॉलिवूडने शुभेच्छांचा वर्षाव केला. शाहरुखच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहतेही खूप उत्साहात होते. शाहरुख दरवर्षी वाढदिवसाला चाहत्यांना भेटायला मन्नत बंगल्याच्या बाल्कनीमध्ये येतो. दरवर्षी चाहते त्याच्या वाढदिवसाला मन्नतबाहेर गर्दी करतात. यावर्षीही मन्नतबाहेर तुफान गर्दी जमली होती. यावर्षी मात्र खास दिवस असतानाही शाहरुख चाहत्यांना भेटायला आला नाही. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले. आता किंग खानने सगळ्यांची माफी मागत यामागचं कारण सांगितलं आहे.