VIP नाही तर सामान्यांच्या रांगेत उभे राहिले, साधेपणाने रणदीप हुड्डा आणि लिन लैश्रामने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, पाहा व्हिडिओ

Randeep Hooda And Lin Laishram Video: रणदीप पत्नी लिनसोबत लालबागच्या राजाच्या पंडालमध्ये पोहोचला होता. याठिकाणी रणदीप हुड्डा यांनी आपल्या पत्नीसह कोणत्याही खास नाही तर सर्वसाधारण लाईनमध्ये एंट्री घेतली आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला.
Randeep Hooda And Lin Laishram
Randeep Hooda And Lin LaishramESakal
Updated on

बॉलीवूड स्टार्सना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरून अनेकदा वाद होतात. मात्र आता अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी अभिनेत्री-मॉडेल लिन लैश्राम यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. नुकतेच या जोडप्याने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मात्र, व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्याऐवजी या जोडप्याने सर्वसामान्यांच्या रांगेत उभे राहून बाप्पाचे आशीर्वाद घेणे पसंत केले. या जोडप्याच्या या कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. चाहते त्यांचे मनापासून कौतुक करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com