

Entertainment News : भारतीय मूल्ये, संस्कृती आणि भावबंध प्रतिबिंबित करणाऱ्या कथांना ‘स्टार प्लस’ वाहिनीने नेहमीच व्यासपीठ दिले आहे. एकता आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची प्रथा-परंपरा या वाहिनीने कायम सुरू ठेवली आहे. यंदाच्या उत्सवाच्या हंगामात, ‘स्टार प्लस’ वाहिनीने 'बैसाखी मिलन' सादर केले. हा एक उत्साहाने काठोकाठ भरलेला उत्सव आहे, ज्यात व्यक्तिगत मालिकेच्या पलीकडे पोहोचत पडद्यावर एक भव्य सांस्कृतिक क्षण निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.