

star pravah new serial
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर गेल्या आठवड्याभरात झी मराठी आणि स्टार प्रवाह दोघांनीही काही नवीन मालिकांची घोषणा केली. यात झी मराठीवर लवकरच 'शुभ श्रावणी' ही मालिका सुरू होणार आहे. त्यात अभिनेत्री वल्लरी विराज मुख्य विराज मुख्य भूमिकेत दिसतेय. मात्र झी मराठीच्या पाठोपाठ आता स्टार प्रवाहने आणखी एका नवीन मालिकेची घोषणा केलीये. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आलाय. यातील अभिनेत्रीला ओळखण्यात मात्र नेटकऱ्यांचा कस लागलाय.