

star pravah new serials
esakal
स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या महिन्याभरात दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. 'पाठराखीण' आणि 'सुना येती घरा'. या दोन्ही मालिकांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. यातील 'पाठराखीण' मालिका १ जूनपासून सुरू होणार आहे. तर 'सुना येती घरा' १५ जूनपासून सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ स्टार प्रवाहने नुकतीच 'विसरू नको तू मला' या मालिकेची घोषणा केलेली. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलेला. यात शाल्व किंजवडेकर आणि तन्वी मुंडले ही जोडी दिसणार आहे. मात्र आता वाहिनीने प्रेक्षकांना आणखी एक सरप्राइज दिलंय.