

star pravah serial time changed
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या प्रेमावर तग धरून असतात. प्रत्येक आठवड्याला या मालिकांचा टीआरपी समोर येतो. ज्या मालिका प्रेक्षक पाहतात त्यांचा टीआरपी अर्थात जास्त असतो मात्र ज्या मालिका प्रेक्षक पाहत नाहीत त्यांचा टीआरपी कमी असतो. कधीकधी मालिका चांगली असूनही मालिकेला टीआरपी नसतो त्यामागचं मोठं कारण म्हणून मालिकेची वेळ. कधीकधी मालिका उशिरा लागत असल्याने प्रेक्षक ती बघणं टाळतात. त्यामुळे वेळ बदलणं मालिकांना भारी पडतं. स्टार प्रवाहच्या अशाच एका मालिकेला वेळ बदलल्याचा फटका बसलाय. त्यामुळे पुन्हा एकदा स्टारने त्या मालिकेची वेळ बदललीये.