

Star Pravah Marathi TV actress serving Warkaris during Ashadhi Wari despite a leg injury
ESAKAL
आषाढी वारीची वारकरी वर्षभर वाट पाहत असतात. आपल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले भक्त चालत वारीला निघतात. वारीमध्ये मराठी इंडस्ट्रीमधले अनेक कलाकार सहभागी होतात. मात्र मराठी इंडस्ट्रीमधली अशी एक अभिनेत्री आहे जी स्वतःच्या पायाला लागलेलं असूनही वारीत वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून देतेय. त्यांच्या पायांची मालिश करून देतेय. ही अभिनेत्री आहे स्टार प्रवाहची आवडती खलनायिका कश्मिरा कलुकर्णी. 'लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसतेय. हीच खलनायिका आता वारकऱ्यांची सेवा करताना दिसतेय. या वारीचा अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितलाय.