
lapandav serial
esakak
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. आता या यादीत आणखी एक मालिका आली आहे. स्टार प्रवाहवर आजपासून म्हणजेच १५ सप्टेंबरपासून ;लपंडाव' ही मालिका सुरू झालीये. या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव सखीच्या भूमिकेत आहे. तर आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले तिच्या आईच्या म्हणजेच सरकारच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता चेतन वडनेरे कान्हाच्या भूमिकेत आहे. नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झालाय.