
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका सध्या चर्चेत आहेत. पण प्रेक्षकांना आवडणारी खास मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पाऊलांनी. अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांची मुख्य भूमिका असलेली मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेत अद्वैत आणि कला त्यांचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिकेत आता त्यात नवीन ट्विस्ट आला आहे. प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.