

pathrakhin serial timing
esakal
गेल्या काही महिन्यांत छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरू झाल्या. त्यातल्या काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यात काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. महिन्याभरापूर्वी स्टार प्रवाहने दोन मालिकांची घोषणा केली होती. त्यात पहिली मालिका म्हणजे 'पाठराखीण' आणि दुसरी मालिका म्हणजे 'सुना येती घरा'. 'पाठराखीण' मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. आता या मालिकेची रिलीज डेट समोर आलीये.