

MARATHI SERIAL TRP
ESAKAL
मराठी मालिकांमध्ये प्रत्येक आठवड्याला कोणती मालिका टीआरपीमध्ये कोणत्या स्थानावर असणार याची स्पर्धा लागलेली असते. या टीआरपीवरच मालिकांचं भवितव्य ठरतं. टीआरपी जास्त म्हणजे प्रेक्षकांची आवड जास्त. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेली तीन वर्ष टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आताही या आठवड्यात 'ठरलं तर मग' ने टीआरपीचा गड राखलाय. अशातच आता गेल्या आठवड्याची टीआरपीची यादी आली आहे. यात स्टार प्रवाहासोबत झी मराठीच्या मालिकांचा टीआरपीदेखील घसरला आहे.