

star pravah ONE MORE SERIAL OFF AIR
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही आठवड्यात अनेक बदल झाले. विशेषतः स्टार प्रवाह वाहिनीवर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काहींनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने नव्या मालिकेची घोषणा केली होती. त्या मालिकेसाठी चांगली सुरू असलेली 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर ही मालिका अचानक गुंडाळण्यात येत असल्याने प्रेक्षक स्टार प्रवाहवर नाराज आहेत. असं असलं तरी आज स्टार प्रवाहने आणखी एका मालिकेची घोषणा केलीये. त्यामुळे आता या नव्या मालिकेसाठी कोणती मालिका निरोप घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.