
गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात झी मराठी आणि स्टार प्रवाहच्या मालिकांचा समावेश आहे. झी मराठीवर लवकरच नवीन मालिका येतेय ज्यात तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे. तेजश्री आणि सुबोध यांच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र तेजश्रीच्या मालिकेला टक्कर देण्यासाठी आता स्टार प्रवाहही मैदानात उतरलंय. स्टार प्रवाहने नुकतीच नव्या मालिकेची घोषणा केलीये.