

star pravah serial off air
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही काळात अनेक बदल झाले. अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोपही घेतला. स्टार प्रवाहने गेल्या महिन्यात तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता त्यातील काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. त्यासाठी स्टार प्रवाहच्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. यापूर्वी 'हळद रुसली कुंकू हसलं' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात होतं. आता स्टार प्रवाहच्या आणखी एका मालिकेने गाशा गुंडाळला आहे. कोणती आहे ती मालिका?