ठरलं! स्टार प्रवाहची प्रसिद्ध मालिका अचानक निरोप घेणार; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा भाग, प्रेक्षक संतापले

STAR PRAVAH SERIAL OFF AIR: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आता अचानक बंद होणार आहे. महिन्याभरापूर्वीच या मालिकेची वेळ बदलली होती.
STAR PRAVAH SERIAL OFF AIR

STAR PRAVAH SERIAL OFF AIR

ESAKAL

Updated on

गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मात्र त्या मालिकांसाठी काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचं निरोप घ्यावा लागला. झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्या टीआरपीसाठी एकमेकांसोबत तगडी स्पर्धा करताना दिसतात. त्यातच स्टार प्रवाहने पुन्हा एका नव्या मालिकेची घोषणा केलेली. ही मालिका म्हणजे 'बाई तुझा आशीर्वाद'. ही मालिका २७ एप्रिल पासून सुरू होणार असल्याची माहिती स्टार प्रवाहने दिली. मात्र या मालिकेची वेळ सांगण्यात आली नव्हती. मात्र आता या मालिकेची वेळ समोर आलीये आणि या मालिकेसाठी एक दुसरी लोकप्रिय मालिका निरोप घेणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com