

STAR PRAVAH SERIAL OFF AIR
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. असं असलं तरी यामुळे जुन्या मालिकांना त्याचा फटका बस्तान दिसतोय. स्टार प्रवाहवर आता आणखी २ नव्या मालिका सुरू होणार आहेत. मात्र त्यासाठी एका मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे. अवघ्या ११ महिन्यात ही मालिका बंद होतेय. प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे वाहिनीने हा निर्णय घेतलाय. ही मालिका आहे 'वचन दिले तू मला'. अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्याबद्दल पोस्ट करत माहिती दिलीये.