
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील उदे गं अंबे ही मालिका सहा महिन्यातच संपणार असल्याची बातमी काल सगळीकडे पसरली. यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण आता या मालिकेच्या कलाकारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मालिकेचा नवीन सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं जाहीर केलं.