
STAR PRAVAH DIWALI
esakal
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिन्यांनी प्रेक्षकांसाठी नवीन मालिकांचा सपाटाच लावला. वेगवेगळे विषय आणि उत्तम कलाकार घेत स्टार प्रवाह आणि झी मराठी यांची जोरदार टक्कर झाली. त्यात काही कथाबाह्य कार्यक्रमांचा देखील समावेश होता. स्टार प्रवाहने काही दिवसांपूर्वीच नवीन मालिकेची घोषणा केली होती. मात्र आता स्टार प्रवाहने आणखी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ज्यात झी मराठीचे कलाकार दिसतायत.