Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मगमध्ये सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत. नागराजचं सत्य हळूहळू समोर येत आहे. त्यातच आता मालिकेत खूप मोठा खुलासा होणार आहे. .सध्या मालिकेत पाहायला मिळतंय की, सायली आणि अर्जुनला सुमनचं अपहरण करण्यामागे नागराजचाच हात होता हे कळून चुकलं आहे. तर महीपत आणि नागराजची मैत्री आहे हे ही त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यातच आता सायली अर्जुनच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागणार आहेत. .प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, चैतन्य अर्जुनला महीपतच्या घराची झडती घ्यायची अधिकृत परवानगी मिळाल्याचं सांगतो. अर्जुन, सायली पोलिसांसोबत महिपतच्या घरात शिरतात. त्याच्या घराची झडती घेताना त्याला एक बिल सापडतं ज्यात त्याला कुणाला तरी पैसे द्यायचे असतात आणि त्या व्यक्तीच नाव एन के असल्याचं उघड होतं. यावरून त्या व्यक्तीचं नाव नागराज किल्लेदार असल्याचं सायली म्हणते आणि सगळ्यांना धक्का बसतो.