Marathi Entertainment News : दैनंदिन मालिकांची चर्चा कायम प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. मालिकांची लोकप्रियता टीआरपी रेटिंग्जवरून ठरते. सध्या स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीमध्ये आघाडीवर आहे. जाणून घेऊया या आठवड्याच्या टीआरपीमधील बदल. .या आठवड्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा टीआरपी समोर आला आहे. यावेळच्या टीआरपीमध्ये महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाले आहेत. काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया. .यावेळी टीआरपी रेटिंगमध्ये खूप बदल पाहायला मिळाले. नेहमीप्रमाणे टीआरपीमध्ये ठरलं तर मग आघाडीवर असली तरीही कथानकातील ढिसाळपणाचा फटका मालिकेच्या टीआरपीला बसला आहे. मालिकेचा टीआरप 4.0 वरून थेट 3.7 वर घसरला आहे. त्या खालोखाल असलेल्या तू हि रे माझा मितवा मालिकेचा टीआरपीही घसरला आहे पण ही मालिका दुसऱ्या नंबरवरील स्थान टिकवून आहे. .तिसऱ्या क्रमांकावर मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका आहे. चौथ्या क्रमांकावर तुझ्या सोबतीने मालिका आहे. तर पाचव्या क्रमांकावर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आहे. विशेष म्हणजे टीआरपी मध्ये खाली असलेल्या लपंडाव मालिका नव्या ट्विस्टमुळे थेट सातव्या क्रमांकावर आली आहे. .आता ठरलं तर मगचा टीआरपी वाढवण्यासाठी स्टार प्रवाह काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. .‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.