
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात काही नवीन मालिका सुरू झाल्या. मालिकांचं हे गणित टीआरपीवर आधारित असतं. मालिकेचा टीआरपी चांगला असेल तर मालिका बराच काळ सुरू राहते. मात्र मालिकेचा टीआरपी कमी असेल तर मात्र मालिका लवकरात लवकर बंद करण्यात येते. मात्र आता स्टार प्रवाहवर एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. स्टार प्रवाहने अचानक चांगली चालणारी मालिका बंद करण्याचा घाट घातला आहे. ज्याला आता नेटकरी विरोध करताना दिसत आहेत. टॉप ३ मध्ये असणारी ही मालिका सुरू होऊन नुकतंच एक वर्ष पूर्ण झालंय. तरीही वाहिनीने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर या मालिकेच्या जागी कोठारे व्हिजनची मालिका दाखवली जाणार आहे.