

lakshmichya pavlani
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतात. त्यातील कलाकार त्यांना आपले वाटतात. मात्र या मालिका जेव्हा अचानक बंद केल्या जातात तेव्हा प्रेक्षकांना देखील धक्का बसतो. गेल्या काही दिवसात स्टार प्रवाहने दोन नवीन मालिकांची घोषणा केली. या मालिकांपैकी एक आहे मधुराणी गोखलेची ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’. ही मालिका ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर, अनुष्का सरकटे व इंद्रनील कामत यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘वचन दिले तू मला’ ही मालिका येत्या १५ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या मालिकांसाठी चांगल्या सुरू असलेल्या मालिकेला बंद करण्यात येणार आहे. या मालिकेतील कलाकारांच्या पोस्ट सध्या चर्चेत आहेत.