बॉलीवूडमधील यशस्वी हॉरर-कॉमेडी फ्रँचायझी 'स्त्री', 'भेड़िया' आणि 'मुंज्या' यानंतर मॅडॉक फिल्म्स पुन्हा एकदा नव्या पर्वासाठी सज्ज झाली आहे. मात्र या वेळी एक मोठा बदल चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पुढच्या टप्प्यात राजकुमार रावच्या जागी रणवीर सिंग झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.