
Bollywood Entertainment News : बॉलीवूडचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर सुभाष घई यांनी झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ च्या मंचावर नुकताच हजेरी लावली आणि या शोमधील एका परफॉर्मन्सने त्यांना भावूक केले. स्पर्धक शुभश्रीने गायलेले ‘ओ राम जी बडा दुःख दीना’ हे गाणे ऐकल्यानंतर सुभाष घई यांना त्यांच्या कारकिर्दीतील एका अनमोल क्षणाची आठवण झाली.