Movie Review: मराठी संगीत नाटकांच्या मांदियाळीतील एक सोनेरी पान म्हणजे संगीत मानापमान हे नाटक. आज काळ बदलला असला आणि आताची पिढी बदललेली असली तरी ही नाट्यकृती अजरामर आहे. नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी हे नाटक लिहिलेले होते. त्यामध्ये बालगंधर्व यांनी काम केले होते. आता याच अजरामर कलाकृतीवर प्रेरित होऊन अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेने संगीत मानापमान हा चित्रपट आणलेला आहे. ही कथा आहे मान आणि अपमान याबरोबरच शौर्याची, धैर्याची, अहमहमिकेची, धाडसाची तसेच हळुवार फुलत जाणाऱ्या प्रेमाची.