
Sakal Tar Hou Dya Movie Review
Marathi Movie Update : प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख असते. कधी कधी आशा-निराशेचा खेळ सुरू असतो. जीवनात अनंत अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. कधी कधी एकाकीपणामुळे आपण निराश होतो. अशा वेळी माणसाने हताश किंवा निराश व्हायचे नसते. जीवनामध्ये आलेल्या निराशेवर मात करून त्यातून आशेचा नवा किरण शोधायचा असतो. कारण जीवन खूप सुंदर आहे आणि या सुंदर जीवनाचा आनंद मनमुरादपणे घ्यायचा असतो.