

Marathi Entertainment News : सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेला तदैव लग्नम या सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. लग्नाविषयी दोन विरुद्ध विचार असलेल्या दोन व्यक्ती जेव्हा लग्नावर चर्चा करण्यासाठी भेटतात तेव्हा काय होतं याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतंच या सिनेमाचं नवीन गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.