
subodh bhave
esakal
बहुगुणी अभिनेता सुबोध भावे उत्कृष्ट अभिनय आणि विविध माध्यमांमधील कामगिरीसाठी ओळखला जातो. ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, आणि ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांमुळे त्याला ‘बायोपिक किंग’ म्हणून ओळख मिळाली. त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच दिग्दर्शक म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी केली आहे. आता तो पुन्हा मोठ्या पडद्यावर एका वेगळ्या रूपात झळकला आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे. नम्रता सिन्हा निर्मित आणि आलोक जैन दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने सुबोधसोबत साधलेला खास संवाद...