
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता ऑगस्ट महिन्यात आणखी काही मालिका सुरू होणार आहेत. प्रेक्षकही या मालिकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची मालिका देखील आहे. नुकताच त्यांच्या 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेचा लॉन्च सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यात सुबोध भावे तेजश्रीसमोर असा काहीतरी वागला ज्यामुळे तेजश्रीदेखील चकीत झाली. या व्हिडीओत तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोधने केलेली खास कृती लक्ष वेधून घेतेय.