

sukanya mone
esakal
मराठमोळ्या अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्कृष्ट काम केलं. त्यांची 'वादळवाट' ही मालिका प्रचंड गाजली. त्या 'बाईपण भारी देवा' मध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेचंदेखील कौतुक झालेलं. नुकतीच सुकन्या यांनी एक मुलाखत दिलीये ज्यात त्या त्यांच्या लठ्ठपणापणाबद्दल बोलल्यात. आपण खूप प्रयत्न करूनही त्या बारीक होत नसल्याचं त्या म्हणाल्यात. शिवाय आपलीच माणसं सतत त्याबद्दल बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं.