नवऱ्याचा शोध की स्वतःच अडकणार नव्या सापळ्यात? 'सन मराठी'च्या 'सौभाग्यवती वृंदा मोहन'च्या प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा

SAUBHAGYAVATI-VRINDA-MOHAN-NEW-MARATHI-SERIAL-SUN-MARATHI: सन मराठीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेच्या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
sun marathi new serial

sun marathi new serial

esakal

Updated on

'सन मराठी' वाहिनीवर अनेक दमदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. 'इन्स्पेक्टर मंजू, हुकुमाची राणी ही' अशा अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. अशातच एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नव्या मालिकेचं नाव 'सौभाग्यवती वृंदा मोहन' असं असून मालिकेचा विषय रहस्यमय आणि गूढतेने भरलेला असल्याचं दिसून येत आहे. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये एक तरुणी तिच्या नवऱ्याचा शोध घेताना पाहायला मिळते. नवऱ्याचा शोध घेत असताना बऱ्याच अडचणींचा सामना तिला करावा लागतो. या शोधामागे नेमकं कोणतं गूढ दडलं आहे आणि वृंदाच्या आयुष्यात कोणती रहस्यं उलगडणार आहेत, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com