VIDEO: सुनील शेट्टी आणि करिश्माचा 'झांझरिया' गाण्यावर जबरदस्त डान्स; धकधक गर्ल माधुरीनं थेट शिट्टी वाजवली, पाहा व्हिडीओ

'डान्स दीवाने 4' या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये करिश्मा आणि सुनील शेट्टी हे डान्स करताना दिसत आहेत.
सुनील शेट्टी आणि करिश्माचा 'झांझरिया' गाण्यावर जबरदस्त डान्स; धकधक गर्ल माधुरीनं थेट शिट्टी वाजवली, पाहा व्हिडीओ
suniel shetty and karisma kapooresakal
Updated on

Suniel Shetty And Karisma Kapoor Dance: छोट्या पडद्यावरील 'डान्स दीवाने 4' हा शो गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.या कार्यक्रमाचं परीक्षण माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) हे करतात. 'डान्स दीवाने 4' (Dance Deewane) या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. अशातच या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरनं (Karisma Kapoor) हजेरी लावली आहे. नुकताच 'डान्स दीवाने 4' या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये करिश्मा आणि सुनील शेट्टी हे डान्स करताना दिसत आहेत.

करिश्मा आणि सुनील शेट्टीचा जबरदस्त परफॉर्मन्स

करिश्मा कपूरनं डान्स दीवाने या शोमध्ये 90 च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यांवर शानदार परफॉर्मन्स केला. तसेच तिनं सुनील शेट्टीबरोबर 'झांझरिया' या गाण्यावर देखील डान्स केला. नुकताच सोशल मीडियावर डान्स दीवाने या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, करिश्मा आणि सुनील शेट्टी हे डान्स करत आहेत आणि त्यांचा डान्स पाहिल्यानंतर माधुरी दीक्षित शिट्टी वाजवते.

पाहा व्हिडीओ:

'झांझरिया' गाण्याला मिळाली प्रेक्षकांची पसंती

1996 मध्ये रिलीज झालेल्या 'कृष्णा' या चित्रपटातील 'झांझरिया उसकी छनक गई' या गाण्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. या गाण्यातील सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. आता या जोडीला पुन्हा एकदा या गाण्यावर थिरकताना पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांच्या डान्सच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

करिश्माचा खास लूक

करिश्मा कपूरनं डान्स दीवाने या शोमध्ये खास लूकमध्ये हजेरी लावली. ब्लू अँड ब्लॅक कलरची साडी, व्हाईट स्टोनचा बेल्ट अन् इअरिंग्स अशा करिश्माच्या क्लासी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.

सुनील शेट्टी आणि करिश्माचा 'झांझरिया' गाण्यावर जबरदस्त डान्स; धकधक गर्ल माधुरीनं थेट शिट्टी वाजवली, पाहा व्हिडीओ
Madhuri Dixit: "दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ..."; मराठी गाण्यावर धकधक गर्लचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
सुनील शेट्टी आणि करिश्माचा 'झांझरिया' गाण्यावर जबरदस्त डान्स; धकधक गर्ल माधुरीनं थेट शिट्टी वाजवली, पाहा व्हिडीओ
Karisma Kapoor: ज्याची निंदा केली त्याच पहिल्या नवऱ्या सोबत फिरतेय करिश्मा कपूर, नेकऱ्यांनी दाखवली जागा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com