

Actor Suniel Shetty Chooses Principles Over 40 Crore Endorsement
Esakal
बॉलिवूड कलाकारांसह अनेक दिग्गजांकडून तंबाखू, सिगारेट, दारू यांचे उत्पादन करणाऱ्या ब्रँडच्या जाहीराती केल्या जातात. यावरून अनेकदा वाद, टीकाही झाल्या आहेत. अशा उत्पादनांच्या जाहिरातीतून पैसे मिळत असल्यानं दिग्गजांकडून अशा जाहिराती केल्या जाता. लोकांकडून त्यांना ट्रोलही केलं जातं. आता बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने कोट्यवधींची तंबाखूची जाहिरात नाकारलीय. ज्यावर विश्वास नाही अशा वस्तूंचं प्रमोशन करणार नाही असं सुनील शेट्टीने म्हटलंय.