Suniel Shetty on Clean Content in Cinema : सुनील शेट्टी यांनी सध्याच्या चित्रपटांतील विनोद 'व्हॉट्सअॅप जोक्स'सारखे वाटतात, अशी परखड टीका केली आहे. 'हेरा फेरी'सारखी क्लासिक कॉमेडी आता दुर्मिळ झाली आहे, असंही त्यांनी म्हटलं.
अभिनय आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते सुनील शेट्टी सध्या 'हेरा फेरी ३' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अशातच त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.