

sunil tawde
esakal
विनोदी असो किंवा गंभीर मराठमोळे अभिनेते सुनील तावडे यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय दिलाय. 'नवरा माझा नवसाचा' ते 'माझी होशील ना' मालिकेपर्यंत सुनील यांनी आपल्या प्रेक्षकांना नेहमीच नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय. सुनील लवकरच स्टार प्रवाहवरील 'बाई तुझा आशीर्वाद' या मालिकेत दिसणार आहेत. यात त्यांची व्यसनी वडिलांची भूमिका आहे. मात्र सध्या त्यांच्या लव्हस्टोरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय. कोर्टात घटस्फोटाची केस सुरू असतानाच ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले असं त्यांनी मुलाखतीत सांगितलंय.